सावंतवाडी / प्रतिनिधी-
यशवंतराव भोसले पाॅलिटेक्निक काॅलेजचे मॅकनिकल विभागाचे प्रमुख प्रा. नाथा वसंतराव साळवे (३८ ) यांचे मुंबई येथे उपचार सुरु असताना निधन झाले. ते काही महीने आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी संस्थेचे पदाधिकारी अच्युत सावंत-भोसले यांनी सवोॅतोपरी प्रयत्न केले होते. परंतु साळवे यांचे मुबई येथे रविवारी निधन झाले. त्यांचे मुळ गाव कराड(सातारा)येथील आहे. ते पाच वषेॅ सावंतवाडीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परीवार आहे. ते विदयाथीॅप्रिय प्राध्यापक होते. त्याच्या निधनाने संस्था एका हुशार प्राध्यापकाला मुकली अशा शब्दात भोसले यांनी श्रध्दांजली वाहीली.