प्रतिनिधी / वारणानगर
पत्रकारांनी लिहिलेले शब्द एकाच वेळी असंख्य वाचक आणि प्रेक्षक वाचत असतात त्यामुळे समाजाला दिशा देण्याची ताकद पत्रकारांमध्ये असते. इंग्रजीत असं म्हटलं जातं की, Pen is mightier than sword, तलवारीपेक्षा लेखणीची ताकद मोठी आहे, समाजाप्रती असलेल्या या बांधिलकीची दखल घ्यावी म्हणून संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त विनिता पाटील यानी केले.
कोडोली ता. पन्हाळा येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी स्कूल मध्ये पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण प्रसिद्ध झाले तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वर्षभर पत्रकारांना विविध सन्मान सोहळ्यांना उपस्थित रहावे लागते, त्याच्या बातम्या द्याव्या लागतात, पण आज पत्रकारांना खास निमंत्रित करण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनाने केलेल्या आदरातिथ्यामुळे सर्वच पत्रकार भारावून गेले. कार्यक्रमाची सुरूवात पत्रकाराच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. काय॔क्रमासाठी आलेल्या पत्रकारांना सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ देऊन विश्वस्त विनिता पाटील, प्राचार्या माधवी के. यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील यांनी, बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेतानाच, आजची पत्रकारिता बदलत्या स्वरूपाची माहिती देऊन, विद्यार्थ्यांनी करीयरचा एक पर्याय म्हणून पत्रकारितेकडे पाहवे असे सांगितले. स्कूलच्या प्राचार्या माधवी के. यांच्या संकल्पनेतून प्रथमच स्कुलमध्ये पत्रकारदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला असल्याचे सांगीतले. बातमीत आपले नांव आले नाही म्हणून अनेकजन विचारतात परंतु चागल्या बातम्यासाठी तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे पत्रकार बाबा माने यानी सांगीतले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले.