आमदार दयानंद सोपटे यांचे उद्गार, आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरण कार्यक्रम
मोरजी/प्रतिनिधी
यशवंत विध्यार्थी हे गावचे भूषण आहे. त्यांचा सन्मान हा प्रत्येकाचा सन्मान आहे, असे उद्गार मांदे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी काढले.
आगरवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित पाहुणे म्हणून मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मुरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, आगरवाडा चोपडेच्या उपसरपंच समिता राऊत, माजी सरपंच तथा विद्यमान पंच प्रमोदिनी आगरवाडेकर, संगीता नाईक, नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष भिंगा हाडकी, मंडळाचे अध्यक्ष सदानंद चोडणकर, सचिव सखाराम नागवेकर, महिला अध्यक्ष महिमा परब,आदी उपस्थित होते.
आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज तपपूर्ती केली आहे. या दरम्यान त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्याबरोबर गावातील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे त्याचा आदर्श इतरांनी घेवून गावचे नाव उज्वल करावे. आगरवाडा गावच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी लवकरच नवीन वास्तू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सोपटे यांनी सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गावच्या विकासाची केंद्रस्थान आहे.या माध्यमातून गावाचा ऐकोपा वाढीस लागतो त्यासाठी सर्वांनी अश्या उपक्रमात सहभागी व्हायला हवे.तसेच मंडळाने सामाजिक उपक्रम राबवला हवे असे जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी सांगितले.
गावा पासून कितीही दूर गेलो तरी गावाची ओढ असतेच. आपले व्यवसाय निमित्त वास्कोत वास्तव्य असलेतरी आपण आपल्या गावाला विसरणार नाही गावच्या विकासात सर्वोतोपरी योगदान दिले जाईल, असे मुरगावचे माजी नगराध्यक्ष तथा आगरवाडाचे सुपुत्र नंदादीप राऊत यांनी सांगितले.
यावेळी 10 वी 12 वी पदवी ,पदव्युत्तर परीक्षेत यशवंत झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच विविध स्पर्धात विजेते ठरलेल्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यामध्ये इयत्ता दहावी ः धनंजय प्रकाश बगळी, प्राची प्रदीप राऊत, निकिता रामचंद्र परब, यश नामदेव परब, गौतमी गजानन परब, अस्मिता रामकृष्ण परब, वैष्णवी विठोबा बगळी, जान्हवी प्रकाश बगळी, नेहा राजेंद्र मसुरकर, समृद्धी श्रीधर परब, शिवानी विश्वास मांदेकर, निधी ज्ञानेश्वर दमाजी, गौरी गजानन परब, रिया रामकृष्ण बगळी, देवेश दत्ताराम गोसावी, सुजाता गुरुनाथ बगळी, दीक्षा भींगा हाडकी, दीपज्योती भिंगा हाडकी, तसेच माटोळी स्पर्धा ः प्रथम वासुदेव गोसावी, गिरिजाबाई उद्धव बगळी स्मरणार्थ, निलेश नागवेकर (द्वितीय), रावजी बाबली राऊत स्मरणार्थ सज्जन परब (तृतीय) लक्ष्मण बगळी स्मरणार्थ. सजावट स्पर्धा प्रथम ः सूरज नाईक (शांताराम नागवेकर स्मरणार्थ), द्वितीय अजय नाईक (हार्दिक नाईक व संस्कृती नाईक पुरस्कृत) तृतीय सज्जन परब (पुंडलिक उर्फ तातो राऊत स्मरणार्थ).
रांगोळी स्पर्धा प्रथम कुमुद कालिदास नाईक केशव नागवेकर स्मरणार्थ, द्वितीय काजल रितेश गावडे (अनुरथ नागवेकर स्मरणार्थ) तृतीय सुहानी महेश परब (श्रीधर नागवेकर स्मरणार्थ). चित्रकला स्पर्धा प्रथम प्रज्ञा देवानंद गोसावी (पंडित बगळी स्मरणार्थ) निशिता निलेश नागवेकर ( महिमा परब पुरस्कृत) तृतीय साची संजय परब (अर्चना नाईक पुरस्कृत).
जयानंद गावकर, सखाराम नागवेकर, अंकिता राऊत सदानंद चोडणकर आदींनी स्पर्धांचे परीक्षण केले. यंदाची श्री मूर्ती प्रमोद आगरवाडेकर यांनी पुरस्कृत केली होती
सुरवातीला सदानंद चोडणकर, सखाराम नागवेकर, बाबली राऊत, रामा बग बगळी, महिमा परब, अर्चना नाईक, जीविता बगळी, रविना बगळी, प्रेरणा बगळी, सुकांती नाईक, सरोज हाडकी यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. विठोबा बगळी यानी सूत्रसंचलन केले, सखाराम नागवेकर यांनी आभार मानले.