प्रतिनिधी / विटा
या वर्षीचा गळीत हंगाम यशवंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने पूर्ण करणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देणार असल्याचे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे यशवंत साखर कारखान्याचे रोलर पूजन आणि हॉपर पूजन पारसनाथ बाबा यांच्याहस्ते आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, यावर्षी यशवंत साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देणार आहे. चालू गळीत हंगाम कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. योग्य भाव आणि वजन यामुळे शेतकऱ्यांना चांगली संधी मिळेल, असेही खासदार पाटील म्हणाले.