वार्ताहर / सौंदलगा
येथील दि ग्रेट तिरंगा युथ असोसिएशन गावडेश्वर गल्ली हे मंडळ प्रतिवर्षी सामाजिक कार्यक्रम राबवित असते. हीच बांधिलकी यंदाही पार पाडत मंडळाकडून दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व निवृत्त जवानांचा सत्कार करण्यात आला.
निवृत्त जवान नंदकुमार पाटील, सचिन पाटील, संतोष पोतदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा येथील विद्यार्थिनी सानिका पाटील, सानिका वराळे, वैष्णवी पाटील तसेच गोमटेश इंग्लिश मेडियम स्कूल निपाणी येथील विद्यार्थी नितीन परमकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप शेवाळे, नंदकुमार पाटील, नितीन परमकर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अमृत चौगुले, बाळासो पाटील, सतीश पाटील, सुनील बोरगावे, दत्ता बोरगावे, सचिन लोहार, सुभाष चौगुले, अवधूत शिंदे, संजय भेंडूगळे, वसंत कुंभार, राजू कुर्ले, अमर सुतार, दिलीप यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप पाटील यांनी तर मारुती भिलुगडे यांनी सूत्रसंचालन केले.