एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विवेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱया गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.
स्मरणशक्तीसाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. अनेक विचारांनी मोकाट सुटलेल्या मनाला आवर घालून ते जाणीवपूर्वक फक्त एकाच विचारावर आणणे म्हणजे मनाची एकाग्रता साधणे असे म्हणता येईल. काही विशिष्ट त्राटक साधना व ध्यान या दोन्ही क्रियेने मन निर्विचार करण्याची व मन एकाच विचारावर बराच वेळ स्थिर ठेवण्याची शक्ती प्राप्त होते. मन एकाग्र करून केलेला प्रत्येक विचार अंतर्मनात जात असतो व साहजिकच स्मरणात रहात असतो.
एखादा विषय लक्षात राहण्यासाठी त्या विषयाबद्दल मनात आवड असणे जरूरीचे आहे. आवड किंवा नावड निर्माण होणे हे आपल्या मनावरच अवलंबून असते. उदा. शाळेतील विद्यार्थ्याला जर एखाद्या विषयाची आवड नसेल तर, तर परीक्षेच्या भीतीने तो विषय लक्षात ठेवण्यासाठी त्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते, भरपूर पाठांतर करावे लागते. परंतू, या विषयात न आवडण्यासारखे काय आहे याचा विचार करून त्याने जर त्या विषयात मन लावले, त्या विषयाबद्दल मनात आवड निर्माण केली तर तो स्मरणात राहण्यासाठी त्याला विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. आवडीने व आनंदाने केलेली प्रत्येक गोष्ट स्मरणात राहतेच.
अतीविचार, मोठा आजार किंवा सतत मानसिक मेहनत यामुळे स्मरणशक्ती कमी होते. तसेच शारीरिक आजारपणामुळे देखील स्मरणशक्ती कमी होते. हवी असलेली माहिती योग्य वेळी आठवत नाही. कल्पना, तर्क-विचार करणे हे बाह्यमनाचे कार्य. जे बाह्यमनाचा जास्त उपयोग करतात, अशांची स्मरणशक्ती कमजोर असते.
एकाग्रता वाढवण्याच्या टिप्स
? एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा.
? कोणतंही काम मन लावून करण्याचा
प्रयत्न करा.
? काम करताना आरामदायी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
? ज्या गोष्टीत मन एकाग्र करायचं आहे, ती सोडून आपले विचार दुसरीकडे भरकटू लागल्याचं लक्षात येताच स्वत:च स्वत:ला थांबवा.
? ध्यानधारणा (मेडिटेशन) कर
एकाग्रता सुधारण्यासाठी काही टिप्स
? एकाग्रता वाढवण्यासाठी कोडी सोडवणं, काही खेळ खेळणं उपयुक्त ठरू शकतं.
? आपल्या हातातील पेन/पेन्सिल न उचलता वर्तमानपत्रातील एखाद्या लेखातील अमूक एखादं अक्षर किंवा स्वर मनाशी ठरवून त्या सगळय़ांभोवती वर्तुळ करणं.
? तीन-चार प्रकारच्या डाळी एकत्र करून त्या निवडून वेगवेगळय़ा करणं.
? दुसऱया कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एखाद्या गोष्टीकडे/वस्तूकडे टक लावून पाहत राहणं.