नुपूर सेनॉनची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री क्रीति सेनॉनची छोटी बहिण नुपूरने देखील मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. नुपूरने अक्षय कुमारसोबत 2019 मध्ये ‘फिलहाल’ गाण्यासोबत पदार्पण केले होते. या गाण्याला मोठी पसंती मिळाल्याने त्याचा दुसरा भाग ‘फिलहाल 2’ देखील सादर करण्यात आला होता. नूपुर आता बॉलिवूडमध्ये दाखल होणार असल्याचे समजते. याचदरम्यान तिने स्वतःच्या कारकीर्दीवरून एक पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल होत आहे.
नुपूर सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असून स्वतःची छायाचित्रे तसेच चित्रफिती चाहत्यांसोबत शेअर करते. नुपूरने इन्स्टाग्रामवर स्वतःची काही छायाचित्रे शेअर करत स्वतःची कारकीर्द आणि यश-अपयशाबद्दल भूमिका मांडली आहे.
माझ्यासाठी लक्ष्यप्राप्ती आणि सतत पुढे जात राहणे महत्त्वपूर्ण आहे. पण पैसा, प्रतिष्ठा आणि यशाच्या प्रवासासोबत येणाऱया सर्व बोनसपेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून उच्च मूल्यांसोबत विकसित होणे महत्त्वाचे असल्याचे नुपूरने म्हटले आहे. स्वतःची मूल्ये आणि नैतिकतेचे रक्षण केले जावे. स्वतःचा स्वाभिमान जपला जावा. स्वतःला एक सुंदर व्यक्ती म्हणून घडविले जावे. यश कायमस्वरुपी नसते तसेच अपयशही कायम राहत नसल्याचे तिने नमूद केले आहे.