नवी दिल्ली
खाजगी क्षेत्रातील बँक यस बँकेच्या चीफ फायनान्शीअल ऑफिसरपदी निरंजन बानोडकर यांची निवड करण्यात आली आहे. शेअर बाजाराला या संदर्भातली माहिती नुकतीच देण्यात आली. येत्या 1 जानेवारी 2019 पासून निरंजन बानोडकर आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. याआधी या पदावर अनुराग अदलखा कार्यरत होते. सध्याला त्यांची निवड चीफ हय़ुमन रिसोर्स ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे. निरंजन बानोडकर यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये कार्य करताना रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट्स, फायनान्शीअल
प्लॅनिंग आणि स्ट्रटेजी यासारख्या विभागांमध्ये 17 पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव घेतला आहे.