मुंबई
खासगी क्षेत्रातील बँक यस बँकेला डिसेंबर अखेरच्या तिमाहीत 151 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. व्याजातील नफ्यातही बँकेने वाढ नोंदवली आहे. एक वर्षाआधी समान कालावधीत बँकेने 18 हजार 560 कोटी रुपये नुकसान नोंदवले होते. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीपेक्षा डिसेंबर अखेरच्या तिमाहीत 29 टक्के इतका निव्वळ व्याज लाभ यस बँकेला झाला आहे. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत बिगर व्याज उत्पन्न 69 टक्के वाढून 1 हजार 197 कोटी रुपयांवर पोहचले आहे.