पॉलिटिक्स अन् त्रिकोणी प्रेमाने भरलेली कहाणी
वेबसीरिज ‘यह काली काली आंखे’चा ट्रेलर सादर झाला आहे. या सीरिजमध्sय ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी, आंचल सिंह, सूर्य शर्मा आणि सौरभ शुक्ला महत्त्वाच्या भूमिके आहेत. ही वेबसीरिज रोमान्स, थ्रिलर, क्राइम, रहस्य आणि आयडेंटिटी क्रायसिसने भरलेली आहे. सीरिजमध्ये पॉलिटिक्स, पैसा आणि पॉवरचा गेम दाखविण्यात आला आहे.
ट्रेलरचा प्रारंभ एका डायलॉगने होतो, ‘तीन चीजें इन्सान को बर्बाद कर सकती हैं – पैसा, ताकत और लडकी’. त्यानंतर श्वेता त्रिपाठीची झलक दिसून येते, ती यात शिखा नावाच्या युवतीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर ताहिर या सीरिजमध्ये विक्रांत ही भूमिका साकारत आहे. तर पूर्वा ही व्यक्तिरेखा आंचल सिंहने साकारली आहे. दोन युवतींमधील संघर्ष आणि एका युवकाला मिळविण्याची कहाणी यात दिसून येणार आहे. ही वेबसीरिज 14 जानेवारी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. याच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.