ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटात दोषी ठरलेल्या याकूब मेमनची समाधी विकल्याच्या आरोपावरून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जजील नवरंगे आणि परवेज सरकरे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याकूबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन यांनी या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे.
याकूब मेमनला 30 जुलै 2015 ला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी दिल्यानंतर एका मोठ्या स्मशानभूमीत पुरण्यात आले होते. नवरंगे आणि सरकरे यांनी मेमनसह इतर तीन जणांच्या समाधीही पाच लाख रुपयांना विकल्याचा आरोप याकूबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन यांनी केला होता. त्यानुसार या दोघांवर 19 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवरंगे आणि सरकरे बॉम्बे ट्रस्टच्या झुमा मशिदीचे विश्वस्त आहेत.