मुंबई
ट्रव्हल क्षेत्रात कार्यरत असणाऱया यात्रा ऑनलाइनने आपला आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव आणण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भातला रीतसर अर्ज कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे सादर केला असल्याचे समजते. सेबीकडे सादर केलेल्या अर्जानुसार कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 750 कोटी रुपये उभारणार आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी 93 लाख 28 हजार 358 इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.