बेंगळूर : टमटम रिक्षा आणि टँकर यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात 5 महिला कामगार ठार झाल्या. हा अपघात बुधवारी दुपारी यादगीर जिल्हय़ाच्या शहापूर तालुक्यातील कोळ्ळूर येथे घडला. अय्यमा (वय 60), शरणम्मा (वय 40), कासिंबी (वय 40), भीमाबाई (वय 40) व देविंद्रम्मा (वय 70) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मुनमुटगी येथून 10 महिला मजूर टमटम रिक्षातून प्रवास करत होत्या. त्यापैकी पाच जणींचा मृत्यू झाला. तर उर्वरित गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शहापूर तालुका इस्पितळात उपचार सुरू आहेत.
Trending
- नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी भाजपमध्ये; आमदार सतेज पाटील गटाला धक्का
- आरोप, प्रत्यारोप नको, शाश्वत विकासावर बोला ! जाणकार मतदारांचे उमेदवारांसह नेत्यांना आवाहन
- विद्यापीठ अंतर्गत 26, 27 एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
- जोतिबाच्या सेवेत गुरव समाजाची सात कुटुंबे! जोतिबा रोडवरील जोतिर्लिंग मंदिरातील परंपरा
- प्रश्नच प्रश्न चोहीकडे…गेला खासदार कुणीकडे..? मुकुंदराव देसाई यांचा सवाल
- भूलथापांना विटलेली जनता भाजप सरकारचा कडेलोट करणार : डॉ. नंदाताई बाभूळकर
- रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!
- मंडलिकांनी विकासकामे मार्गी लावलीत; चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन