महापालिकेच्या दवाखान्या मधून प्रमाणपत्र देणे बंद : मनपा आयुक्त पी. शिवशंकर
सोलापूर : प्रतिनिधी
कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे. त्यामूळे यापूर्वी अन्य जिल्हा व राज्यात जाण्यासाठी महापालिकेच्या दवाखान्या मधून देण्यात येणारे प्रवास प्रमाणपत्र देणे बंद केले असून त्याऐवजी शहरातील खाजगी नोंदणीकृत डॉक्टरांकडून सदरचे प्रमाणपत्र देणार देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी दिली.
सोलापूर शहरातून अन्य जिल्हा/ राज्यात जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय दाखला शहरातील सर्व युपीएचसी सेंटर, अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह, आ. डी. एच. हॉस्पिटल या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून देण्यात येत होते. ही कार्यपद्धती आपत्कालीन परिस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता कार्यान्वित करण्यात आलेली होती. परंतू शहरांमध्ये कोव्हिडं19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोलापूर महानगरपालिकेकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेची कोव्हिडं19 रुग्णांची कामकाजासाठी आवश्यकता आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामूळे यापुढे सोलापूर शहरातून अन्य जिल्हा व राज्यात जाण्यासाठी प्रवास करणार्या नागरिकांना वैद्यकीय दाखला देण्याचे कामकाज (अत्यावश्यक परिस्थिती वगळता) स्थगित ठेवण्यात आलेले आहे.
त्याएवजी सोलापूर शहरातून अन्य जिल्हा/ राज्यात जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय दाखला नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिकाकडून (डॉक्टरकडून )घेण्याची तरतूद केली आहे. त्यामूळे यापुढे सदरचे दाखले नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून घेण्याचे आवाहन महापालिकेकडून केले आहे.