कोरोनामुळे घेण्यात आला निर्णय, कमानी तसेच इतर खर्च सुवर्ण सिंहासनाला देण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावची दुर्गामाता दौड एक ऐतिहासिक दौड आहे. या दौडमध्ये दरवषी हजारो तरुण, तरुणी भाग घेतात. नवरात्रोत्सवात 9 दिवस ही दौड चालते. मात्र यावषी कोरोनामुळे साध्या पध्दतीने ही दौड काढण्याचा निर्णय श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरामध्ये बैठक घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे.
नवरात्रोत्सवामध्ये शहरासह उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागातही दुर्गामाता दौड काढली जाते. पहाटेच्यावेळी भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान करुन तरुण आणि तरुणी उत्स्फुर्तपणे या दौडमध्ये भाग घेतात. मात्र कोरोनामुळे यावषीची दौड साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. समाजाच्या हिताच्या दृष्टिने व शासनाच्या नियमावलीनुसार ही दौड काढली जाणार आहे. शिवप्रति÷ान हिंदुस्थान ही संघटना देश आणि धर्माच्या हितासाठी आजपर्यंत कार्य करत आली आहे. त्यामुळे देशासाठी आणि धर्मासाठी आम्ही ही दौड साध्या पध्दतीने काढणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासन जे नियम घालून देईल त्या नियमांचे पालन करत ही दौड काढण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्व तरुणांनी याला संमती दिली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना भगाव देश बचाव अशा घोषणांनी ही दौड या वषी काढली जाणार असल्याचे किरण गावडे यांनी सांगितले. या दौडचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी कमानी उभारण्यात येतात तसेच इतर भगवी सजावट करण्यात येते. मात्र ते न करता रायगडावर सुवर्णसिंहासन उभारण्यात येणार आहे. या सुवर्णसिंहासनासाठी तीच रक्कम द्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
या बैठकीला तालुका प्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, शहरकार्यवाह विश्वनाथ पाटील, अजित पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, चंदु चौगुले, अनंत चौगुले, प्रमोद चौगुले, अंकुश केसरकर, मदन मुचंडी, विनायक कोकितकर, नामदेव पिसे, प्रसाद बाचोळकर, महेश गावडे, महेश जांगळे, प्रफुल्ल शिरवलकर, संदीप पाटील, कपिल पाटील, हिरामणी मुचंडी, शेखर पाटील, वैभव कदम, प्रसाद धामणेकर, शुभम पाटील, महेश पाटील, श्रीधर शहापूरकर, निहाल जाधव, प्रथम बोकमूरकर, यतेश हेब्बाळकर, सचिन चोपडे, महेश संभाजी, प्रशांत पिंगट, राजू गुरव, रमेश मंगण्णावर, परशराम काकतकर, जोतिबा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.