जुन्या पुस्तकांच्या आधारेच करावा लागणार अभ्यास : शैक्षणिक नुकसान होणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 5 हजार 300 शाळा आहेत. नूतन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांसमोर पाठय़पुस्तकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवषी शिक्षण खाते पाठय़पुस्तके वेळेत दिली जातील, अशी ग्वाही देते. परंतु, दरवषीच पुस्तके मिळण्यास विलंब होतो. यावषीसुद्धा पुस्तके मिळण्यास उशीर होण्याची शक्मयता आहे.
बेळगाव जिल्हय़ाला 26 लाख 19 हजार 713 पाठय़पुस्तकांची गरज आहे. मात्र, 15 मेपर्यंत फक्त 41 टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पुस्तके घेऊन अभ्यास करावा लागणार आहे.
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 40 लाख 74 हजार 760 पुस्तकांची गरज आहे. पण आतापर्यंत फक्त 36.6 टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. कन्नड, मराठी, इंग्रजी व उर्दू या चारही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळालेली नाहीत. पुस्तके वेळेवर उपलब्ध न झाल्याने केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, असे नाही तर शिक्षकांनासुद्धा विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात अडचणी येणार आहेत.
खात्याची बुक बँकची संकल्पना
यावर उपाय म्हणून शिक्षण खात्याने बुक बँकची संकल्पना पुढे आणली आहे. पुढच्या वर्गात जाताना विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके बुक बँकेमध्ये जमा करावीत. जेणेकरून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असे शिक्षण खात्याचे म्हणणे आहे.