ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱयांना कटिबद्ध राहण्याचे निर्देश दिले.
दिल्ली विधानसभांच्या निवडणुकीपूर्वी ‘आप’ने जाहीर केलेल्या दहा ‘गँरटी कार्ड’ योजनांच्या अंमलबजावणीसाठी अरविंद केजरीवाल यांनी विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीला सचिव व मुख्य सचिवांनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते.
या बैठकीत केजरीवाल यांनी शहरात अखंडपणे वीजपुरवठा, कचरा मुक्त दिल्ली, अनाधिकृत वसाहतींमधील पायाभूत सुविधा, महिला सुरक्षा, उत्तम दर्जाचे शिक्षण, मोफत बस सुविधा आणि यमुना स्वच्छता यासारख्या इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱयांना तयारीत राहण्याच्या सूचना केल्या. तसेच या योजनांबरोबरच शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.