तरुणभारत ऑनलाइन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय आहेत.त्या सोशल मीडियावर आपली राजकीय मते देखील मांडत असतात. तसेच त्यांची गाणी देखील व्हायरल होतात.पण सध्या त्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृता कान्स चित्रपट महोत्सवाला गेल्या आहेत.अमृता यांनी कान्सला नेमकी का हजेरी लावलीय अशी चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चेला अमृता यांनी पूर्णविराम दिलाय. कान्सला नेमक्या कोणत्या कारणानिमित्त त्या गेल्यात याबद्दलची माहिती त्यांनी नवीन पोस्टमध्ये फोटोंसहीत दिलीय.
अमृता यांनी काही दिवसांपूर्वीच अमृता यांनी कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावत असल्याचं सांगत एक फोटो पोस्ट केला होता. पण अनेकांना अमृता या नेमक्या कोणत्या कारणासाठी गेल्या असतील असा प्रश्न पडला होता. मात्र आता अमृता यांनी नवीन पोस्टमधून थेटपणे आपण या महोत्सवाला का उपस्थित होतो याची माहिती दिलीय. “कान्स चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. अन्न, आरोग्य आणि शाश्वत (विकास) या विषयांसंदर्भातील जगृकतेसाठी हा कार्यक्रम होता. आयव्हरी कोस्टच्या फर्स्ट लेडी डॉमिनिक ओउटारा, राजकुमारी गिदा तलाल, अभिनेत्री शेरॉन स्टोन, किरा चॅम्पलिन यांच्यासोबत रेड कार्पेटवर उपस्थिती लावली. हा कार्यक्रम बेटर वर्ल्ड फाउण्डेशनने आयोजित केलेला,” असं अमृता यांनी फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहाल आहे. फोटोंमध्ये अमृता यांनी पाश्चिमात्य पद्धतीचा करड्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.