ऑनलाईन टीम / पोर्ट लुईस :
मॉरिशसच्या आग्नेयेकडील ग्रँड सेबल समुद्रकिनाऱ्यावर 18 मृत देवमासे आढळून आले आहेत. देवमाशांचा पोट आणि फुप्फुसांचा विच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
हे 18 देवमासे ग्रँड सेबल समुद्रकिनाऱ्यावर वाहून आले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. ऑगस्टच्या सुरुवातीला जपानी जहाजातून झालेल्या 1 हजार टनापेक्षा जास्त तेलगळतीमुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, देवमाशांच्या शरीरावर किंवा त्यांच्या श्वसनसंस्थेत हायड्रोकार्बनचे अंश आढळले नाहीत.
बुधवारी सायंकाळपर्यंत या देवमाशांच्या विच्छेदनाचे काम सुरू होते. त्याच्या अहवलातून माशांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी सांगितले.