ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 66 लाख 55 हजार 740 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 4 लाख 50 हजार 381 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, अमेरिकेत शनिवारी 1 लाख 40 हजार 732 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 2889 जणांचा मृत्यू झाला. 2.66 कोटी कोरोना रूग्णांपैकी 1 कोटी 63 लाख 28 हजार 950 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 98 लाख 76 हजार 409 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 24 हजार 488 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. येथे 14 लाख 44 हजार 854 रुग्ण आढळून आले. त्यामधील 43 हजार 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.