ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र, क्युबा या देशाने दोन वर्षांहून अधिक वयाच्या मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. 2 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करणारा क्युबा हा जगातील पहिला देश ठरला आहे.
क्युबामध्ये लोकांना ‘अब्दला’ आणि ‘सोबराना’ या लसी दिल्या जातात. या देशाने क्लिनिकल चाचण्या पूर्ण करून यापूर्वीच 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली होती. मात्र, सोमवारपासून या देशाने 2 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. या वयोगटातील मुलांवरील चाचण्या लस उत्पादक कंपन्यांनी पूर्ण केल्या असल्या तरीदेखील जागतिक आरोग्य संघटनेने त्याला मान्यता दिली नाही.