ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातचा ८५ वा भाग येत्या रविवारी म्हणजेच ३० तारखेला प्रसारीत होणार आहे. नव्या वर्षातला हा पहिलाच कार्यक्रम असेल. या महिन्यात मात्र या कार्यक्रमाची वेळ काहीशी बदलली आहे. सकाळी ११ ऐवजी या रविवारी हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता प्रसारीत होणार आहे. ३० जानेवारीला महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.