ऑनलाईन बील भरण्याचे आवाहन, सरासरी मिळणार बील
प्रतिनिधी/ बेळगाव
घरोघरी जावून विद्युत मीटरचे रिडींग घेवून बील देण्यात येत होते. परंतु सध्या कोरोनाची वाढती धास्ती पाहता एप्रिल महिन्यात विद्युत मीटरचे रिडींग घेण्यात येणार नाही. मागील महिन्याची सरासरी काढून या महिन्याचे बील देण्यात येणार आहे. आलेले बील ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस स्वरूपात देण्यात येणार आहे. हेस्कॉमकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वच व्यवहार जरी ठप्प करण्यात आले असले तरी विजेची गरज प्रत्येकाला आहे. सुरळीत विजपुरवठा करण्यासाठी हेस्कॉमचे कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. परंतु या महिन्यात कोरोनामुळे रिडींग घेणे अशक्मय आहे. तसेच इमारतींमध्ये रिडींग घेण्यास दिले जात नसल्याने सरासरी बील देण्यात येणार आहे.
मध्यंतरी हेस्कॉमने ग्राहकांचे मोबाईल क्रमांक जमा करून घेतले होते. त्या मोबाईल क्रमांकावर मेसेज, व्हॉट्सअप व ईमेल करण्यात येणार आहेत. तसेच बील भरून घेतले जाणार नसल्याने नागरिकांना ऑनलाईन बील भरावे लागणार आहे. पेटीएम, पे, गुगल पे, मोबाईल वॉलेट तसेच हेस्कॉमच्या वेबसाईटला जावून बील भरता येणार आहे.
कनेक्शन कापले जाणार नाही
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्याने नागरिकांना विजेचे बील भरण्यास समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे याकाळात कोणत्याही ग्राहकाचे कनेक्शन कापले जाणार नाही, तसेच त्याला कोणताही दंड लावण्यात येणार नाही. नागरिकांसाठी ऑनलाईन बील भरण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनी ते भरण्याचे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.
एम. टी. अप्पन्नावर (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम) या महिन्यात कोरोनाच्या धोक्मयामुळे घरोघरी रिडींग घेणे शक्मय नाही. कर्मचाऱयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत विभागाने सरासरी बील देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विजेचे बील ग्राहकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. नागरिकांना ऑनलाईन हे बील भरण्याचे आवाहन त्यांनी केले