ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या कोरोना लसीपासून अर्धांगवायूचा धोका असल्याचा गंभीर इशारा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने दिला आहे. यापूर्वी या लसीमुळे रक्त गोठल्याची काही प्रकरणे समोर आली होती.
अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतलेल्या लोकांमध्ये गुलियन बेरी सिंड्रोमची 100 संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामधील 95 टक्के प्रकरणे गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. इम्युन सिस्टम नर्व्ह सेल्स खराब होऊन स्नायू कमकुवत होऊन अर्धांगवायू होतो. तेव्हा गुलियन बेरी सिंड्रोमही होतो. इतर लसींपेक्षा जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतलेल्या लोकांमध्ये अशा प्रकारचा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 12.8 कोटी लोकांना जॉन्सन अँड जॉन्सन, 14.6 कोटी लोकांना फायझर मॉडर्ना कंपनीची लस देण्यात आली आहे.