10 नववर्ष 2020 मध्ये संपूर्ण वर्षांत एकूण 6 ग्रहणे येणार आहेत. यामध्ये
2 सूर्यग्रहणे आणि 4 चंद्रग्रहणांचा समावेश आहे. या सर्व चंद्रग्रहणात चंद्र पूर्णपणे झाकला जाणार नाही आणि चंद्राची काळी छाया पृथ्वीवर पडणार नाही. 10 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण एकूण 4 तास 5 मिनिटे सुरू राहील. ग्रहण सुरू होण्याची वेळ 10 रोजी रात्री 11 वाजून 37 मिनिटांची असून, मध्यरात्री 2 वाजून 42 मिनिटांनी समाप्त होईल.
जानेवारी रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. या दिवशी पौष पौर्णिमा असल्याने याचं महत्व आणखी वाढलं आहे. जवळपास चार तास असणारे हे चंद्रग्रहण भारत, युरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसणार आहे.
चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण, दोन्ही घटना या खगोलीय आहेत आणि प्रत्येक वषी घडतच असतात. मात्र, काही नागरिक यावरुन आपले अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात करतात. ग्रहण काळात विशेष काळजी घेण्यात यावी, असं म्हटलं जातं. अनेकजण मानतात की, ग्रहण एक अशुभ घटना आहे आणि त्यामुळे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
चंद्रग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?
हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील असून, भारतात दिसणार आहे. ग्रहण कालावधीत चंद्र धुरकट दिसेल. छायाकल्प चंद्रग्रहण शास्त्रानुसार पूर्ण ग्रहणासारखे नसते. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे पंचांगकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. चंद्रग्रहणाचे वेध 10 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी लागणार असून, मध्यरात्री ग्रहण सुटल्यानंतर म्हणजेच 2 वाजून 40 मिनिटांनी वेध समाप्त होतील.