ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारमधील शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी 25 वर्षानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयात 11 वी कला शाखेत महतो यांनी रांगेत उभे राहून रेग्युलर वर्गासाठी प्रवेश घेतला.
शिक्षणमंत्री महतो यांचे वय 52 वर्ष आहे. ते 28 व्या वर्षी 10 वी उत्तीर्ण झाले होते. राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला नव्हता. सध्या मंत्री असल्याने 10 वी पास शिक्षणमंत्री अशी त्यांच्यावर टीका होत होती. त्यामुळे त्यांनी राज्यशास्त्र विषय घेऊन 11 वी कला शाखेत प्रवेश घेतला.
सोमवारी महाविद्यालयात जाऊन महतो यांनी रांगेत उभे राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. त्यासाठी 1100 रुपये फी त्यांनी भरली. विधानसभा आणि 11 वी या दोन्ही वर्गांची सांगड घालणार असल्याचे महता यांनी म्हटले आहे.