मालदीवचे विदेश मंत्री – पाकिस्तानला बसला झटका
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
मालदीवचे विदेशमंत्री अब्दुल्ला शाहिद हे संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. 2018 मध्ये मालदीवने त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. भारताने त्यांच्या उमेदवारीला समर्थन दिले होते. शाहिद यांना 148 मते मिळाली तर विरोधात केवळ 48 मते पडली आहेत.
महासभेचे हे पद वार्षिक आधारावर वेगवेगळय़ा देशांना मिळत असते. शाहिद 76 व्या महासभेचे अध्यक्षत्व सांभाळणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2021-22 असणार आहे. मालदीवसारख्या छोटय़ा देशाला जागतिक व्यासपीठावर इतके मोठे पद पहिल्यांदाच प्राप्त झाले आहे.
शाहिद एक यशस्वी मुत्सद्दी मानले जातात. बहुराष्ट्रीय व्यासपीठांना हाताळण्याचा त्यांना अनुभव आहे. भारत आणि मालदीवचे संबंध सध्या अत्यंत उत्तम आहेत. विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी शाहिद यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत आणि मालदीवचे संबंध अत्यंत चागले आहेत. शाहिद यांच्यापूर्वी तुर्कस्तानचे वोल्कन बोजकिर या पदावर होते. काही दिवसांपूर्वी ते पाकिस्तान दौऱयावर गेले होते आणि तेथे त्यांनी काश्मीर प्रकरणी वादग्रस्त विधान केले होते. बोजकिर यांच्या विधानाला मान्यता देत नाही. भारतातील केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरसंबंधी त्यांनी केलेल्या विधानाला आम्ही तीव्र विरोध करतो असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्याने म्हटले होते. शाहिद आता या पदावर आल्याने पाकिस्तानची महासभेतील बाजू कमजोर होणार आहे.