मेलबर्न : 17 जानेवारीपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूष आणि महिलांच्या एकेरी प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याचे भारतीय टेनिसपटूंचे स्वप्न संपुष्टात आले आहे.
पात्र फेरीच्या गुरूवारी येथे झालेल्या पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात झेकच्या मॅकहॅकने भारताच्या युकी भांब्रीचा 6-1, 6-3 असा पराभव केला. या पराभवामुळे भांब्रीचे पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न भंगले. त्याचप्रमाणे भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरन, रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांचे आव्हानही यापूर्वीच संपुष्टात आल्याने आता ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत भारताचा एकही स्पर्धक एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये खेळताना दिसणार नाही.