ऑनलाईन टीम / तेहरान :
इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे बोईंग 737 हे विमान कोसळले आहे. या विमानातून प्रवास करणाऱया 180 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तेथील स्थानिक वृत्तसंस्थांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते. विमानाने उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर हे विमान तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमातळाजवळ कोसळले. या विमानातून प्रवास करणाऱया 180 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही.