ऑनलाईन टीम / तेहरान :
युक्रेन एअरलाईन्सचे प्रवासी विमान इराणने क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिली आहे.
तेहरानमध्ये युपेनचे बोईंग 737 हे विमान 8 जानेवारीला कोसळले होते. विमानातून प्रवास करणाऱया 176 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातादरम्यान, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहचला होता. दोन्ही देशांकडून हल्ले सुरु होते. त्यामुळे हा हल्ला इराणनेच घडवून आणल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
तर हा हल्ला क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नाही तर विमानातील बिघाडामुळे झाल्याचा दावा इराणने केला होता.
विमान अपघातावेळी इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर 22 क्षेपणास्त्र डागली होती. त्यामधील एक क्षेपणास्त्र चुकून या विमानाला धडकले. त्यामुळे चुकून हे विमान कोसळले, अशी कबुली इराणच्या लष्कराने दिली आहे.