तुमची मुलं आमच्या मुलांना मारत आहेत
एका आईच्या जीवनात तिच्या अपत्यांहून अधिक मूल्यवान काहीच नसते. परंतु रशियाच्या हल्ल्यात युक्रेनने आतापर्यंत 71 मुलांना गमाविले ओ. तर 100 मुलांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या मुलांचे भविष्य कसे असेल हे कुणालाच माहित नाही. या युद्धात शिकार होत असलेल्या मुलांचे दुःख जगासमोर आणत युक्रेनच्या प्रथम महिला आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या पत्नी ओलेना यांनी रशियन मातांना एक उद्देशून भावुक पत्र लिहिले आहे.
कुठल्याही आईच्या जीवनात तिच्यासाठी सर्वात मूल्यवान काय असते? माझ्या मनानुसार याचे उत्तर त्यांची मुले हेच असावे. परंतु हे धोकादायक युद्ध या मुलांसाठी मरण घेऊन येत आहे. ‘मृत्यू’ आणि ‘मुले’ हे दोन शब्द आज एकत्र चालत आहेत. एक आई म्हणून हे शब्द एकत्र बोलणे देखील माझ्यासाठी अशक्य वाटते. माझ्यासाठी याचा अर्थ तुटलेली मनं, तुटलेली कुटुंबं अणि फुटलेले नशीब असा आहे असे ओलेना यांनी पत्रात म्हटले ओ.
हा रक्तपात पाहून काय वाटते?
तुमची मुले जेव्हा आमच्या मुलांना मारून टाकतात तेव्हा काय वाटते असे रशियन मातांना विचारू इच्छिते. रशियाचे सैनिक आमच्या देशात बॉम्बचा वर्षाव करत आहेत. जगातील कुठलीही आई स्वतःच्या मुलाला इतरांच्या मुलांचे रक्त वाहू देणार नाही. आतापर्यंत रशियाच्या मातांनी मौन धारण केले आहे. त्या घाबरल्या आहेत की त्यांनी याकडे पाठ फिरविली आहे? रशियाचे सैन्य सर्वसामन्य जनतेला लक्ष्य करत नसल्याचे काही जण म्हणत आहेत, अशा लोकांना मी आमच्यापासून कायमसाठी हिरावल्या गेलेल्या मुलांची छायाचित्रे दाखवू इच्छिते. ज्यांना अद्याप नीट श्वास घेणेही जमत नव्हते, अशा मुलांना निर्दयपणे मारून टाकण्यात आल्याचे ओलेना यांनी पत्रात म्हटले आहे.
तुमच्या मुलांनी किती युक्रेनियन मुलांची कत्तल केली आहे हे पहा. अखेर तुमच्या मुलांना का करण्यासाठी युक्रेनमध्ये पाठविण्यात आले आहे हे जाणून घ्या. युक्रेनची प्रथम महिला म्हणून मी स्वतःच्या देशाच्या मुलांना प्रेरित करते. परंतु मी स्वतः युक्रेनच्या मुलांना आणि मातांना पाहून प्रेरित होत आहे, जे या संकटकाळात परस्परांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत असे ओलेना यांनी नमूद केले आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 15 हजार मुलांचा युक्रेनमध्ये जन्म झाला आहे. या मुलांना शांतता काय असते हे कधी कळू शकेल का? सुंदर आकाशाऐवजी काळोख्या तळघरातील भिंती ते पाहतील असे ओलेना यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.