64 किलोमीटर लांबीचा होता रशियाचा ताफा : रात्रीच्या वेळी ड्रोनच्या मदतीने केला विध्वंस
कीव्हच्या दिशेने जात असलेल्या रशियन सैन्याच्या 64 किलोमीटर लांबीच्या ताफ्याला उद्ध्वस्त केल्याचा दावा युक्रेन सैन्याच्या एका स्पेशल युनिटने केला ओढ. युक्रेनच्या 30 सैनिकांच्या एका विशेष युनिटने ड्रोनच्या मदतीने रशियन सैनिकांच्या एका लांब ताफ्यावर एका मागोमाग एक असे अनेक हल्ले केले आहेत.
रशियाने चिलखती वाहनांच्या आणि रणगाडय़ांच्या 64 किलोमीटर लांबीच्या ताफ्याद्वारे राजधानी कीव्हला वेढा घालण्याची तयारी केली होती. परंतु हा ताफा पुढे सरकू शकला नाही. असे का घडले याचा खुलासा युक्रेनच्या वायुदलाशी निगडित युनिट एअरोरोज्विद्काचे कमांडर लेफ्टनंट कर्नल यारोस्लाव हॉन्कर यांनी आता केला आहे.
जंगलाच्या मार्गात हल्ला
या यशामुळे 30 आयटी तज्ञाांच्या बाइकर फोर्सची मोठी भूमिका राहिली. या फोर्सने ताफ्याला विखुरण्यासह धान्य तसेच शस्त्रास्त्रांच्या रसदीपासून तोडले आहे. रशियन सैन्य इवान्कीव्ह शहरानजीक जमा झाले होते. ड्रोनने युक्त क्वाड बाइकस्वार या सैनिकांनी जंगलाच्या मार्गाने गोरिल्ला युद्धाच्या धर्तीवर रशियाच्या ताफ्यावर घात लावून रात्री हल्ले केल्याची माहिती हॉन्कर यांनी दिली आहे.
ड्रोनद्वारे केला हल्ला
या सैनिकांकडे नाइट व्हिजन चष्मे, स्नायपर रायफल्स, थर्मल इमेजिंग कॅमेऱयांनी युक्त ड्रोन देखील होते. या छोटय़ा युनिटने पहिल्याच यात्री ताफ्यातील तीन वाहनांना नष्ट केले. युटिनने पुढील 3-4 दिवसांमध्ये अनेक वाहनांना नुकसान पोहोचविले. हे सर्व 30 सैनिकांमुळे घडले आहे. या युनिटचे पहिले प्रमुख वोलोदिमिर कोचेट्कोव्ह-सुकच हेते. ते पूर्वी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करायचे. परंतु 2015 मध्ये ते डोनबास येथे मारले गेले होते.
रशियाच्या कब्जातून इरपिन मुक्त
युक्रेन रशियाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत ओह. युक्रेनच्या सैन्याने कीव्हनजीकच्या इरपिनला रशियाच्या कब्जातून मुक्त करविले आहे. पुढील काळात आमच्या शहरावर आणखीन हल्ले होतील आणि आम्ही धैर्याने त्यांना सामोरे जाऊ असे उद्गार इरपिनचे महापौर ओलेक्झेंडर मार्पुशिन यांनी काढले आहेत.