ऑनलाईन टीम / तरुण भारत
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला असुन काही वेळ चर्चेच्या माध्यमातुन गुंता सोडवण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न आता मागे पडले आहेत. कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना पुतिन यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं म्हटले आहे. असं सांगताना युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडल्याचे ते म्हणाले.
यावर बोलताना पुतिन म्हणाले कि, युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. हे बोलताना त्यांनी अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा विरोध केला असून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला असून आणखी निर्बंध लावले जातील असं स्पष्ट केलं आहे. मात्र दुसऱ्या बाजुला युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली असून देशात मार्शल लॉ लागू केला आहे.
परिणाम मात्र सर्वांना भोगोवे लागतील
तीसऱ्या महायुद्ध कोणत्या ही राष्ट्रांमध्ये झालं तरी परिणाम मात्र संपुर्ण जगावर कमी – जास्त प्रमाणात होणार आहेत. कारण दोन्ही राष्ट्रांनी ऐकमेकांवर शड्डु ठोकल्याने दोन्ही देशांचे तर नुकसाण तर होणार आहेच. तर यात इंधनाच्या खाणींचे ही नुकसाण होण्याची शक्यता आहे. आणि खाणींचे नुकसाण म्हणजे इंधनाच्या खाणी भस्मसात होणे ज्याचा परिणाम जगभरातील इंधन दर भडकणार आहेत. त्यामुळे युद्ध कोणत्या ही देशात झालं तरी याचे परिणाम मात्र संपुर्ण जगावर होणार आहेत.