चर्चेसाठी रशियाकडून अटी, जनमत संग्रहानंतर निर्णय
मॉस्को / वृत्तसंस्था
लुहान्स्क, डोनेस्क, खेरसान आणि जपोरिझिया हे युक्रेनचे चार भाग रशियात समाविष्ट करण्यात आले आहेत, अशी घोषणा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. या चारही भागांमध्ये जनमतसंग्रह करुन हा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. या चार भागांच्या प्रशासकांनीही या घोषणेला दुजोरा दिला आहे. आपण युक्रेनशी शांतता बोलणी करण्यास तयार आहोत, असे पुतीन यांनी स्पष्ट केल. मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या.
या चार भागांनी रशियात समाविष्ट होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुतीन यांनी या समावेशाला मान्यता दिली. त्यांनी या चार भागांच्या स्वीकृतीपत्रावर शुक्रवारही स्वाक्षरीही केली. त्यामुळे हे चारही भाग आता अधिकृतरित्या रशियाचा भाग बनले आहेत. स्वीकृतीपत्रावर स्वाक्षरी पेमलिन येथे करण्यात आली. त्यानंतर पुतीन यांनी भाषणही पेले. त्यांनी या चार भागांच्या प्रशासकांशी चर्चाही केली.
युक्रेनचा कडवा विरोध
रशियाने आपले चार भाग एकतर्फी पद्धतीने स्वतःमध्ये समाविष्ट करुन घेतले आहेत. हे भाग अद्यापही युपेनचेच आहेत, असे प्रतिपादन या देशाचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. या भागांच्या रशियामधील कथित विलीनीकरणाला आम्ही कधीही मान्यता देणार नाही. आम्ही शेवटपर्यंत आमच्या सार्वभौमत्वाचा संघर्ष सुरु ठेवणार आहोत. रशियाने केलेला जनमतसंग्रह अवैध आहे. या जनमतसंग्रहाला आम्ही प्रथम पासूनच विरोध केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाश्चिमात्य देशांकडून निंदा
या चारही प्रदेशांमधील 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी रशियात समाविष्ट होण्यास संमती दिली आहे, असा दावा रशियाने केला असला तरी पाश्चिमात्य देशांनी या जनमत संग्रहाची कठोर निंदा केली आहे. रशियाने हा जनमतसंग्रह बंदुकच्या धाकावर करुन घेतला असून तो लोकशाहीच्या मार्गाने आणि पारदर्शी पद्धतीने झालेला नाही. 2014 मध्ये युपेनच्या क्रिमिया प्रदेशावरही रशियाने अशाच प्रकारे ताबा मिळविला होता. आता पुन्हा रशियाने हीच आगळीक केल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, असा इशारा काही देशांनी दिला आहे.