ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरु आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. तर युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडले आहेत. जवळपास 20 हजार नागरिक आणि विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना आणि भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार कामाला लागलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची याबाबत चर्चा झालीय. अशी माहिती स्वतः गडकरी यांनी दिलीय. सरकार सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची यादी तयार करत आहे. या ठिकाणी विमाने नेण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर तेथील भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे, अशी माहितीही आज गडकरी यांनी दिलीय. तूर्तास युक्रेनमधील भारतीयांच्या मदतीसाठी युक्रेनमध्ये आणि भारतातही केंद्र सरकारने वेगवेगळ्या हेल्पाइन तयार केल्या आहेत. नागरिकांनी त्यांची माहिती या हेल्पाइनवर द्यावी, मदत मिळेल असे आवाहन करण्यात आले आहे.
युक्रेनमधील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी भारतीय दुतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. ते पुढीलप्रमाणे…
भारतीय दुतावासाची युक्रेनमधील हेल्पलाइन
+38 0997300483
+38 0997300428
+38 0933980327
+38 0625917881
+38 0935046170
पररराष्ट्र मंत्रालयाची भारतातील हेल्पलाइन
01123012113
01123014104
01123017905
1800118797 (टोल फ्री)
011-23088124 (फॅक्स )
ई-मेल situationroom@mea.gov.in
नाशिकमधील हेल्पलाइन
0253- 2317151
1077 (टोल फ्री)
ई-मेल ddmanashik@gmail.com
सोलापूरमधील हेल्पलाइन
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, so दूरध्वनी 0217-2731012
ई मेल rdcsolapur@gmail.com / ddmo.rfsol-mh@gov.in