ऑनलाईन टीम / तरुण भारत
युक्रेन – रशिया सुरु असलेलले युद्ध तीन आठवडे उलटून गेले तरी सुरुच आहे. जगावर याचे अनिष्ट परिणाम होत असुन कचे तेलाचे भाव ही वाढले आहेत. त्यामुळे जगातील बहुतांशी देशांवर महागाईची टांगती तलवार आहे. तर भारत, श्रीलंका, नेपाळ सारख्या आशियाई राष्ट्रांवर याचा परिणाम झाला आहे. तसेच विकसित राष्ट्रे ही या वातावरणामुळे धास्तावली आहेत. रशियाने अजूनही आपले हल्ले कमी केले नसून मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनमधील मारियोपोल शहरातील एका थिएटरवर शक्तीशाली बॉम्ब टाकला आहे. या बॉम्बहल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून थिएटरमध्ये सुमारे १००० ते १२०० लोकांनी आश्रय घेतलेला होता.
रशियन सैनिकांनी बुधवारी थिएटरवर शक्तिशाली बॉम्ब टाकल्याची माहिती युक्रेनियन परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तेसेच बॉम्बहल्ला झालेल्या थिएटरमध्ये १००० ते १२०० लोकांनी आश्रय घेतल्याचा दावा केलाय. दुसरीकडे युक्रेनच्या या दाव्याचे रशियाने खंडन केले आहे. रशियन सैनिकांनी थिएटरवर हल्ला केलेला नाही. तर या हल्ल्यामागे युक्रेनमधीलच अझोव्ह बटालीयन या अतिउजव्या संघटनेचा हात आहे, असा असं रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
युरोपीयन माध्यम NEXTA TV ने युक्रेनमधील स्थानिक माध्यमांचा हवाला देत थिएटरमध्ये आश्रय घेतलेले सर्व लोक आता मातीच्या ढिगाऱ्याखाली आहेत, असं म्हटलंय. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,१४३ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतली नसली तरी बॉम्ब हल्ल्याच्या ठिकाणी आश्रयाला असलेल्या नागरिकांचा यात नाहक बळी गेला आहे. याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आली नसली तरी. जीवीतहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं स्पष्ट आहे.