मृतदेहाची विटंबना करण्यात मानतात धन्यता
कीव्ह / वृत्तसंस्था
युक्रेन आणि रशिया यांचे युद्ध आता 45 व्या दिवसात पोहचले आहे. युपेनने अपेक्षेपेक्षा अधिक काळ प्रतिकार चालविला. रशियाला अनुमानाप्रमाणे झटपट विजय मिळविता आलेला नाही. तरीही हे युद्ध किती दिवस चालणार याचे काहीही उत्तर आज तज्ञांकडेही नाही. आता रशियाने युक्रेनमध्ये आपले ‘निर्दय’ सैनिक उतरविल्यामुळे परिस्थितीला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे.
सैनिकांच्या या प्रकाराला ‘रसिच’ असे संबोधन आहे. 2014 मध्ये या विशेष गटाची स्थापना करण्यात आली. यां सैनिकांची कार्यपद्धती हिटलरच्या नाझी सैनिकांप्रमाणे असते. म्हणून त्यांना निओ नाझी मिलिशिया असेही नाव आहे. रशियाने युक्रेनमधील महत्वाचे स्थान खार्किव्हच्या आसपास त्यांची नियुक्ती केली असून या सैनिकांचे कारनामे अंगावर शहारा आणणारे असतात असे बोलले जाते.
मृतदेहांची विटंबना
हे सैनिक शत्रूच्या सैनिकांचे प्राण घेतल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे कान, नाक आदी अवयव कापतात. एखादी स्पर्धा जिंकून चषक मिळवावा, तसे हे अवयव मिरवतात. कोणी किती कान जमा केले यावर त्यांचा पराक्रम ठरतो. त्यांच्यात असे अवयव जमा करण्याची स्पर्धाही लागते, अशा बऱयाच बाबी सांगितल्या जातात. माणसांची प्रेते जळताना जी दुर्गंधी वातावरणात पसरते ती त्यांना अतिशय आवडते असेही त्यांच्यासंबंधाने अनेक अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे.
सोशल मिडियावर छायाचित्रे
एका जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रशियन मिडिया वाहिनी ‘वोकॉन्टॅक्ट’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार रसिचचा एक सैनिक मिचलकोव्ह यांने काढलेली काही छायाचित्रे त्यांची कार्यपद्धती दर्शवितात. मिचलकोव्ह याने या गटात 2015 मध्ये समावेश करुन घेतला आणि त्याचे प्रशिक्षण तेव्हाच सुरु झाले. 2014 मध्येच युक्रेनच्या सैन्याशी संघर्ष होत असताना या सैनिकांनी त्यात भाग घेतला होता. मिचलकोव्ह स्वतःला उघडपणे नाझी समर्थक मानतो. रसिचमध्ये सध्या साधारणतः 100 सैनिक असावेत. त्यांचे प्रशिक्षणही अतिशय कठीण असते त्यामुळे त्यांची मनोवृत्ती अशी निर्दय आणि भावनाशून्य असते, असे मत आहे.
वॅगनर-रसिच यांचा हातात हात
रशियाच्या अध्यक्षांच्या अत्यंत निकट असणारा वॅगनर नावाचा गट आहे. या गटाचे आणि रचिचचे अतिशय सख्य आहे. वॅगनर गट रशियन सरकारसाठी विविध देशांमध्ये आणि रशियातही गुप्तहेरगिरीचे काम करतो असा आरोप होत असतो. रशियन सरकारचे हे ‘खासगी’ सैन्य असल्याचे मानण्यात येते. लिबिया, सिरीया, मोझांबिक, माली, सूदान आणि मध्य आफ्रिका आदी देशांमध्ये गृहयुद्ध घडवून आणण्यासाठी हा गट सक्रीय असतो, असाही आरोप पाश्चिमत्य देश करतात. वॅगनर गटाचे नेतृत्व दिमित्री उत्किन यांच्याकडे आहे.
एकत्र बळ मोठे
वॅगनर आणि रसिच यांचे एकत्र बळ शत्रूला घाबरवून सोडण्यास सक्षम आहे. या दोन्ही गटांमधील सदस्य संख्या जरी तुलनेने कमी असली तरी त्यांची दहशत मात्र मोठी आहे, असे अनेक वृत्तसंस्थांनी आजवर नमूद केले आहे.
एका व्यंगचित्रामुळे खळबळ
रसिचच्या वतीने नुकतेच एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्यात एक रशियन सैनिक युद्ध आघाडीवरुन घरी परतलेला दाखविण्यात आला आहे. हा सैनिक आपल्या कुटुंबियांसाठी युद्धभूमीची भेट म्हणून रक्ताने माखलेले अवयव आणि वस्तू घेऊन येतो, असे या व्यंगचित्रात दाखविण्यात आलेले आहे. त्यामुळे या रचिचची दहशत पसरलेली आहे. असे सैनिक युक्रेनमध्ये उतरविल्याने रशिया आता वादाच्या भोवऱयात सापडणार हे निश्चित मानले जात आहे.
युद्धाचा क्रूर खेळ…
ड वॅगनर आणि रसिच या दोन गटांची मोठी धास्ती
ड प्रतिस्पर्ध्याला दयामाया न दाखविता करतात खात्मा
ड नाझी पद्धतीची कार्यपद्धती, जागतिक टीकेचा विषय
ड पेमलिनच्या जवळचे मानले जाणारे आहेत हे गट