युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चकडून रशियाच्या हल्ल्याचा विरोध, जेलेंस्की यांना ज्यू ठरवून पुतिन यांच्याकडून समर्थन
रशिया, युक्रेन आणि बेलारुसला पूर्वेकडील स्लावच्या (जातीय समूह) लोकांचा देश म्हटले जाते. एक हजार वर्षांपासून तिन्ही देश समान धार्मिक मूल्यांचे पालन करत आले आहेत. अशा स्थितीतअता युक्रेनमधील ऑर्थोडॉक्स चर्च रशियाच्या हल्ल्याला विरोध करत आहे. तर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की हे ज्यू असल्याचा दाखला देत हल्ल्याला योग्य ठरवून धर्माचे कार्ड पुढे करत आहेत. याच्या उलट जेलेंस्की चर्चच्या दोन्ही गटांमध्ये एकतेचा पुरस्कार करत आहेत.
युक्रेन आणि रशिया दोघेही रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी आहेत. परंतु युक्रेनियन चर्चला सोव्हिएत कालखंडात कम्युनिस्ट सरकारांकडून झालेल्या दडपशाहीची जाणीव आहे. सोव्हिएत कालखंडात धार्मिक स्वातंत्र्य नव्हते. रशियाकडून झालेला हल्ला त्यांना मागील काळातील आठवणी ताज्या करून देणारा ठरला आहे.
युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चने 2019 मध्ये रशियन ऑर्थोडॉक्स चर्चपासून वेगळे होत स्वतःला स्वतंत्र केले होते. आता युक्रेनच्या चर्चला अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांकडून आर्थिक आणि अन्य मदत मिळते. रशियाला हा प्रकार मंजूर नाही.