12 दिवसातच अर्थव्यवस्था कोलमडली
युद्ध कुठल्याह देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक प्रभाव पाडत असतो. भूतकाळातही अनेकवेळी युद्धामुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्था बिकट संकटात सापडल्या होत्या. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान देखील अशाच प्रकारचा परिणाम दिसून येतोय. युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर तर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे रशियाची अर्थव्यवस्था देखील अत्यंत दबावात आहे.
रुबलममध्ये जोरदार घसरण
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा थेट परिणाम रशियाच्या चलनावर दिसून आला आहे. रशियाचे चलन रुबल सोमवारी डॉलरच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमकुवत झाले आहे.
व्याजदरांमध्ये जबरदस्त वाढ
रशियाच्या मध्यवर्ती बँकेने सोमवारी प्रमुख व्याजदराला 9.5 टक्क्यांवरून दुप्पटीने वाढवत 20 टक्के केले आहे. आपत्कालीन स्थितीत हे पाऊल उचलत आहोत, कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अचानकपणे अत्यंत बदलली असल्याचे रशियाच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.
वित्तीय संस्था स्विफ्टमधून बाहेर
अमेरिकेसह अनेक देशांनी रशियाच्या विरोधात कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे रशियाला इंटरनॅशनल पेमेंट स्विफ्टमधून बाहेर काढणे देखील सामील आहे. या निर्बंधांमुळे रशियावर सर्वाधिक प्रभाव दिसून येणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.
मोठय़ा कंपन्यांनी गाशा गुंडाळला
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या अनेक कंपन्यांनी रशियातून स्वतःचा गाशा गुंडाळला आहे. यात ऍपल, सॅमसंग, कोका कोला यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या यादीत डिस्ने, बोइंग, बीपी, एक्झॉन मोबाइल, जनरल मोटर्स, फॉक्सव्हॅगन, मास्टरकार्ड आयकीया, डियाजियो, व्हॉल्वो, डायमलर आणि रेनॉ यासारख्या कंपन्यांचा समावेश
आंतरराष्ट्रीय व्यापारावर संकट
या युद्धामुळे रशियाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. रशियाकडून होणारी निर्यात आता मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे. तर आयातही थांबणार असल्याने देशात अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
रशियाचे आर्थिक संकट
रशियाचे चलन रुबलमध्ये जोरदार घसरण
रुबल कमकुवत झाल्याने व्याजदर 20 टक्क्यांपर्यंत वाढले
332 अब्ज डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर संकट
रशियाच्या महत्त्वाच्या आर्थिक संस्था स्विफ्टमधून बाहेर, आयात-निर्यातीवर होणार परिणाम
केंद्रीय बँकेची 630 अब्ज डॉलर्सची संपत्ती जप्त
मोठय़ा कंपन्या, उदाहरणार्थ बीपी, एक्झॉन मोबाईल देशाबाहेर पडल्या