हल्लासत्रामुळे 20 लाख नागरिकांचे युक्रेनमधून पलायन : सुमीतील हवाई हल्ल्यात 22 ठार
कीव्ह / वृत्तसंस्था
युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. युपेनची राजधानी कीव्ह आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार बॉम्बहल्ले होत आहेत. हल्ल्याचा बुधवारी चौदावा दिवस होता. 14 दिवसांनंतरही रशियाचे युपेनवरील हल्ले कमी झालेले नाहीत. याचदरम्यान युक्रेनने रशियाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याने पुन्हा एकदा द्विपक्षीय प्रतिनिधींमध्ये बोलणी सुरू होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. झेलेन्स्की यांनी ‘नाटो’च्या मुद्दय़ावरून थोडीशी नरमाई घेतल्यामुळे द्विपक्षीय चर्चेत सुधारणा झाल्याचे दिसत आहे. याचवेळी रशियाने युक्रेनमधील सरकार उखडून टाकण्याचा आपला उद्देश नसल्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
सुमी शहरातील ह्यूमन कॉरिडॉर बुधवारीही खुले करण्यात आले होते. मात्र, या भागातही हल्लासत्र सुरू असून एका ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मंगळवारी सुमीतील हय़ूमन कॉरिडॉरच्या माध्यमातून 694 भारतीयांसह 5,000 लोकांची सुटका करण्यात आली होती. दरम्यान, रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या 20 लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे, यामध्ये 8 लाख लहान मुलांचा समावेश असल्याचा दावा ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेने केला आहे. दरम्यान, राजधानी कीव्हसह अनेक शहरांमध्ये आता सर्वत्र विध्वंस दिसत आहे. त्याचवेळी, युपेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व देश आपल्या लोकांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पाकिस्तानी विद्यार्थिनीची भारताने केली सुटका
‘मिशन गंगा’ अंतर्गत भारताने आतापर्यंत हजारो लोकांना युक्रेनमधून बाहेर काढले आहे. या मोहिमेदरम्यान भारत अन्य देशांनाही मदत करत आहे. आता एका पाकिस्तानी विद्यार्थिनीलाही युपेनमधून सुरक्षित बाहेर पडल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. पाकिस्तानी विद्यार्थिनीचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात ती स्वतःला पाकिस्तानी महिला असल्याचे सांगत आहे. “माझे नाव अस्मा शरीफ आहे. आम्हाला मदत केल्याबद्दल आणि इथून सुरक्षितपणे बाहेर काढल्याबद्दल मी कीव्हमधील भारतीय दुतावासासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते.’’ असे तिने म्हटले आहे. अस्माची भारतीय अधिकाऱयांनी सुटका केली असून ती लवकरच तिच्या घरी पोहोचणार आहे.
18 हजारांहून अधिक भारतीय मायदेशी
युक्रेनमधील वातावरण पाहता भारताने ऑपरेशन गंगा मोहीम सुरू केली, ज्याअंतर्गत आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांना त्यांच्या मायदेशी आणण्यात आले आहे. यावेळी रोमानियाहून दोन विमानांद्वारे 410 भारतीयांना परत आणले. ऑपरेशन गंगा अंतर्गत, 75 विशेष नागरी उड्डाणांद्वारे 15,521 भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे, तर 2,467 लोकांना भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी परत आणण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी 2,467 लोकांना परत आणले. तसेच आतापर्यंत युपेनच्या शेजारील देशांना 32 टनांपेक्षा जास्त मदतीचे साहित्य पाठवण्यात आले आहे.
रशियावरील निर्बंधांमध्ये वाढ
रशियाने युपेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक राजकारण झपाटय़ाने बदलत आहे. सध्या पाश्चात्य राष्ट्रे रशियावर कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युपेनमध्ये चालवलेली लष्करी कारवाई थांबवणे आणि रशियन अर्थव्यवस्थेची आर्थिक कोंडी करणे हा या निर्बंधांचा उद्देश आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तर रशियावर लावलेल्या निर्बंधांची यादीच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये वाचून दाखवली आहे. त्यानुसार सर्व प्रमुख रशियन बँकांची मालमत्ता गोठवण्यात येणार असून त्यांना ब्रिटनच्या आर्थिक प्रणालीतून वगळण्यात आले आहे. तसेच ब्रिटनच्या बाजारपेठेतून प्रमुख रशियन कंपन्यांना पतनिर्मिती करता येऊ नये यासाठी कायदे करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच उच्च-तंत्रज्ञानाच्या वस्तू आणि तेल शुद्धीकरण उपकरणांच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली असून रशियन नागरिकांच्या ब्रिटनच्या बँक खात्यांमधील ठेवींवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ब्रिटनप्रमाणेच ऑस्ट्रेलियाने कडक पवित्रा घेत रशियातून तेल आयात थांबवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका यापुढे रशियाकडून कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करणार नसल्याच जाहीर केले आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांची झेलेन्स्कींशी चर्चा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी बुधवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट संवाद साधला. कॅनडाने युक्रेनला युद्धासाठी लागणारी काही निवडक आणि महत्त्वाची उपकरणे आणि शस्त्रास्त्रे पाठविण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच रशियाविरोधात लागू करण्यात आलेले निर्बंध आणि युक्रेनसाठी मानवीय भावनेतून करण्यात येत असलेल्या मदतीबाबतही चर्चा झाली.