वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युगांडाचे पथक गेल्या आठवडय़ात जपानमध्ये दाखल झाले. दरम्यान युगांडाच्या पथकातील एका प्रशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने आता या पथकातील आठ सदस्यांना जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
युगांडाच्या या पथकातील नऊ सदस्यांच्या मुष्टीयोद्धयांचे शनिवारी येथे आगमन झाले आहे. कोरोना समस्येमुळे विदेशातील येणाऱया विविध देशांच्या खेळाडूंना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. युगांडाच्या मुष्टीयोद्धा प्रशिक्षकाची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या प्रशिक्षकाला आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.