दोन्ही कंपन्यांच्या आयपीओतून 3500 कोटी उभारण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
सप्टेंबर महिन्यात आयपीओ बाजारात मोठी धमाल सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये युटीआय म्युच्युअल फंड आणि माझगाव डॉक यांचा आयपीओ येत्या 29 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. एक ऑक्टोबर रोजी हा आयपीओ बंद होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
दोन कंपन्यांकडून जवळपास 3500 कोटी रुपयांचा आयपीओ उभा करण्याचे संकेत आहेत. तसेच यात यूटीआय जवळजवळ 3,000 कोटी रुपये आणि माझगाव डॉक 450-500 कोटी रुपये उभारणार आहे. या संदर्भातील किंमत बँड 28 तारखेला घोषित करण्यात येणार आहे.
माझगाव डॉक ही सरकारी कंपनी आहे. कंपनी आयपीओच्या मदतीने जमा होणारी रक्क्म ही भांडवल आणि अन्य खर्चासाठी वापरणार आहे. युटीआय ही देशातील आठवी सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी आहे. याचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे. म्हणजे यातील हिस्सेदारीत सर्व पैसे लावण्यात येणार आहेत. याच्या आधारे कंपनीने 3.89 कोटी समभाग विक्री करण्याचे नियोजन केलेले आहे.
चालू वर्षातील 11 वा आयपीओ
युटीआयच्या सदरच्या सवलतीमधून 2 लाख इक्विटी समभाग योग्य कर्मचाऱयांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. चालू वर्षातील हा 11 वा आयपीओ राहणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.