नौदलाकडून चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था / विशाखापट्टणम
भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणविजयमध्ये आग लागली आहे. या दुर्घटनेत 4 नौसैनिक जखमी झाले आहेत. युद्धनौका विशाखापट्टणम बंदरावर असताना ही दुर्घटना घडली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण नौदलाने युद्धनौकेत आग लागण्याच्या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
विशाखापट्टणम बंदरावरील या दुर्घटनेत 4 नौसैनिक जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित आयएनएसएच कल्याणीमध्ये दाखल करण्यात आले आहे. चारही नौसैनिकांवर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी नौदलाने चौकशीसाठी बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.