लष्करी तळांवर जोरदार बॉम्बवर्षाव : बेलारुस, क्रीमिया, पूर्व युक्रेनमधून एकाचवेळी हल्लाबोल : शंभरहून सैनिक-नागरिक ठार
कीव्ह / वृत्तसंस्था
युक्रेनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी सकाळी युद्धाची घोषणा केली. या घोषणेनंतर कीव्हसह अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्बहल्ले करण्यात आले. तसेच लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यासाठीही बॉम्बवर्षाव करण्यात आला. संयुक्त राष्ट्राने (युएन) पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. मात्र, रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर युद्धाचा भडका उडाला. तसेच या कारवाईत हस्तक्षेप करणाऱयांची काही खैर नाही, असा इशारा रशियाने दिल्याने जागतिक पातळीवर याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, ‘नाटो’ संघटना युक्रेनच्या पाठीशी असून चीनने रशियाला रसद पुरविण्याची तयारी दर्शवली आहे. युक्रेनच्या सैन्यानेही रशियाला सडेतोड प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असून मोठय़ा प्रमाणात जीवितहानीचेही वृत्त आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवस तणाव कायम होता. याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना संवादाच्या पातळीवरून तोडगा काढण्यास सांगितले होते. याचदरम्यान रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यामुळे तणावात आणखीनच भर पडली होती. आता याचे मोठय़ा संघर्षात रुपांतर झाले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युपेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. मात्र, युपेननेही संघर्षाला तोंड देण्यासाठी प्रतिकार सुरू केला आहे.युक्रेनच्या उत्तरेकडून म्हणजे बेलारुसकडून रशियाने हल्ला केला असून रशियन सैन्य युक्रेनच्या भूप्रदेशात प्रवेश केला आहे. त्याचबरोबरच ब्रुसेल्समधूनही रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. मात्र या हल्ल्याला युपेनकडूनही जोरदार उत्तर दिले जात आहे. राजधानी कीव्हमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज घुमू लागले आहेत. अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजवत युपेनने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
युपेनला चौफेर घेरण्याची तयारी
रशियाने युक्रेनला एकाचवेळी अनेक बाजूंनी युपेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली असून जवळजवळ 25 ठिकाणी हल्ले केले आहेत. आमच्यावर हल्ला करुन जबरदस्तीने आमच्या देशावर ताबा मिळवण्याचा हा रशियाचा आक्रमक पवित्रा आहे. आमच्या देशातील शांततापूर्ण शहरांवर रशिया सध्या सर्व बाजूंनी हल्ले करत आहे, असे युपेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ईशान्येकडून रशियन लष्कर देशामध्ये घुसखोरी करत आहे. देशाची राजधानी कीव्ह आणि दुसरे सर्वात महत्वाचं शहर असणाऱया कारकीवमधील लष्करी तळांवर रशियाने मिसाइलने हल्ला केल्याचे युपेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले.
एकीकडे नागरिकांना इशारा देताना दुसरीकडे आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत असे युपेनने स्पष्ट केले. त्यानुसार युपेन रशियाच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली. रशियन फायटर जेट्स पाडण्यासाठी युपेनच्या संरक्षण दलांकडून जमीनीवरुन मारा केला जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युपेनच्या राजदुतांनी रशियाने युद्ध पुकारल्याची माहिती दिली. पुतीन यांनी घोषणा केलेली विशेष कारवाई ही गेल्या कित्येत वर्षांपासून त्रास सहन करणाऱया युपेनच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.
‘जशास तसे…’चा युक्रेनचा दावा
युपेनच्या लष्कराने रशियाच्या 50 लष्करी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. युपेननेही रशियाला जशास तसे उत्तर दिल्याचे म्हटले आहे. रशियाची सहा विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युपेनने केला. युपेनमधील लुहान्स प्रांतामध्ये ही विमाने पाडण्यात आली. लुहान्स्क हा युपेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक असून तो सुरक्षित झाल्याचे सांगण्यात आले. मात्र याचदरम्यान रशियन लष्कराने युपेनकडून करण्यात आलेला हवाई हल्ला हाणून पाडल्याचा दावा केला.
कुठे अन् कसा झाला हल्ला…
युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ला झाला आहे. रशिया, बेलारुस आणि क्रीमिया सीमेवरून प्रचंड सैन्य घुसवण्यात आले. लुहान्स्क, खार्किव, चेरनिव्ह, सुमी आणि जेटोमिर प्रांतात हल्ले सुरूच आहेत. रशियन भूदलाने युपेनमध्ये घुसून तेथील अनेक गावे ताब्यात घेतली. रशियन कमांडो पॅराट्रूपर्स युपेनच्या लष्करी तळांजवळ उतरून त्यांचा ताबा घेत आहेत. युपेनने 50 रशियन सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. त्याची 6 लढाऊ विमाने आणि 4 रणगाडे उद्ध्वस्त करण्यात अली आहेत.