हल्ल्यांमध्ये अपार्टमेंट-घरे सर्व उद्ध्वस्त : 1 लाखाहून अधिक लोकांना फटका
युक्रेनवर रशियन हल्ल्याचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. गुरुवारी रशियाने संपूर्ण युपेनमध्ये 200 हून अधिक हल्ले केले. त्यामुळे सर्वच भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भयभीत झालेल्या लाखो लोकांनी भुयारी मार्ग, मेट्रो स्टेशन, भूमिगत निवारा आदी ठिकाणी आश्रय घेतला. या संघर्षानंतर अनेक ठिकाणी लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धात अनेकांनी आपले प्रियजनही गमावले आहेत. शुक्रवारी सलग दुसऱया दिवशीही रशियाचे युपेनवर हल्ले सुरूच आहेत. राजधानी कीव्हमध्ये शुक्रवारी सकाळी 7 मोठे स्फोट झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. रशियन सैन्याने निवासी भागांनाही लक्ष्य केले आहे.
युक्रेनमधील वेगवेगळय़ा 14 प्रांतात 203 ठिकाणी रशियन सैन्याने हल्ले केले आहेत. रशियन सैन्याने चेर्नोबिल अणुप्रकल्प ताब्यात घेतला आहे. कीव्हजवळील युपेनच्या एअरबेसवरही रशियाने ताबा मिळवला आहे. रशियन सैन्यही राजधानी कीव्हमध्ये दाखल झाले आहे. रशियन विमान अँटोनोव्ह-26 युपेनजवळील वोरोनेझ भागात कोसळले. हे विमान उपकरणांची वाहतूक करत असल्याचे रशियाने म्हटले आहे. विमानातील क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. मात्र, जीवितहानीचा नेमका आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
राजधानी कीव्हमध्ये गुरुवारी रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू कायम होता. रात्रभर स्फोट आणि हवाई हल्ल्याचे आवाज ऐकू येत होते. याचदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी लोकांना सतर्क करत दिवे बंद करण्याची सूचना करत असलेल्या ठिकाणीच राहण्याचे आवाहन केले. युपेनच्या सैन्याने 7 रशियन विमाने, 6 हेलिकॉप्टर, 30 टँक नष्ट केल्याचा दावा युपेनच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. तसेच 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केल्याचेही सांगितले. 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत.
कीव्हवर ताबा मिळविण्याची धडपड
रशियाचे सैन्य राजधानी कीव्हमध्ये घुसल्याचा दावा युपेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. जरी रशियन रणगाडे कीव्हपासून 32 किमी अंतरावर असले तरी रशियन सैन्याला रोखण्यासाठी युपेनच्या लष्कराने तीन पूल उडवून दिले आहेत. रशियाची ही चाल सुरू राहिल्यास येत्या चार दिवसात कीव्ह पूर्णपणे रशियाच्या ताब्यात जाईल.
पुतीन यांच्याविरोधात रशियातही निदर्शने
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही जगाच्या देशांतर्गत रोषाचा सामना करावा लागत आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या विरोधात विविध शहरांमध्ये लोकांनी तीव्र निषेध केला. या आंदोलनानंतर 1700 लोकांना ताब्यात घेण्यात आले.