रशियन सैन्य कीव्हमध्ये डेरेदाखल : युक्रेनला हवीय शांतता, पण रशियाकडून शरणागती पत्करण्याची अट
कीव्ह / वृत्तसंस्था
रशियाने सलग दुसऱया दिवशीही युक्रेनवर आक्रमक हल्ले सुरूच ठेवले आहेत. आपल्या बचावात युक्रेनही रशियावर हल्ला करत आहे. रशियाचे सैनिक राजधानी कीव्हमध्ये दाखल झाल्याची माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी दिली. कीव्ह ताब्यात आल्यानंतर अन्य ठिकाणी ताबा मिळविण्याचा रशियाचा इरादा आहे. तथापि, युक्रेनला शांतता हवी असल्याने त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र, युक्रेनियन सैन्याने शस्त्रे टाकल्यानंतरच आम्ही चर्चेसाठी तयार असल्याची स्पष्टोक्ती रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी दिल्याने संघर्षाची धग कायम आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर रशियाने गुरुवारी जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे आक्रमण सुरू केले. दुसऱया महायुद्धानंतर युरोपियन राष्ट्रावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने ईशान्य आणि पूर्वेकडे सरकत असल्याची अधिकृत माहिती शुक्रवारी सूत्रांकडून देण्यात आली. याचदरम्यान आतापर्यंतच्या संघर्षात 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर, युक्रेनचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचे रशियाने म्हटले आहे. युपेनच्या अध्यक्षीय सल्लागार मायखाईलो पोडोलिक यांनी शुक्रवारी युक्रेन चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, युक्रेनने शस्त्रे खाली ठेवल्याशिवाय चर्चेचे दरवाजे खुले केले जाणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. युपेनवर ‘नव-नाझी’चे राज्य असावे अशी मॉस्कोची इच्छा नाही, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी शुक्रवारी सांगितले.
चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात किरणोत्सर्ग
गुरुवारी रात्री रशियन सैन्याने युक्रेनच्या चेर्नोबिल न्यूक्लियर पॉवर प्लान्टजवळ हल्ले केले. येथे अनेक स्फोटही झाल्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी वाढली आहे. युपेनच्या न्यूक्लियर एजन्सीने याला दुजोरा दिला आहे. किरणोत्सर्गाच्या वाढत्या पातळीमुळे या भागात राहणाऱया हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच त्यांना आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
सैन्यात सहभागी होण्याचे युक्रेनचे नागरिकांना आवाहन
युपेनच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना लष्करात सहभागी होण्याचे आवाहन केले. लष्करात सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. भले तुम्ही अल्पवयीन असाल, असे युपेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे. आज युपेनला सर्वकाही हवे आहे. लष्करात सहभागी होण्याची प्रक्रिया सहजसोपी करण्यात आली आहे. केवळ पासपोर्ट आणि ओळखपत्र क्रमांकासोबत लष्करात सहभागी व्हा. प्रवेशासाठी वयाची कुठलीही अट नाही, असे लष्करी कमांडरनी स्पष्ट केले आहे.
शेअर बाजारांमध्ये सुधारणा
रशियाने युपेनवर हल्ला केल्यानंतरच्या दुसऱया दिवशी शेअर बाजारांमधील पडझड बऱयापैकी सावरलेली दिसून आली. हल्ल्याच्या पहिल्या दिवशी आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. तर दुसऱया दिवशी आशियाई बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे. भारताच्या शेअर बाजारातही चांगली सुधारणा दिसून आली. शुक्रवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात दोन टक्क्मयांची वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 1,300 अंकांची वाढ पाहायला मिळाली तर निफ्टीचा आकडा 16 हजारांच्या पार गेला आहे. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 2,700 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. गेल्या दोन वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण ठरली होती. तर निफ्टी निर्देशांक 815 अंकांनी खाली आला होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 13.44 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.