क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
किल्ला येथील युनायटेड फोर्टतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत अशोक पाटील संघाने डॉ. संजीव पाटील संघाचा 3-2 अशा सेटमध्ये पराभव करून युनायटेड फोर्ट चषक पटकाविला.
गेली 41 वर्षे किल्ला परिसरातील नागरिक एकत्र येवून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करतात. या स्पर्धांना किल्ला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल
स्पर्धेत एकूण 6 संघानी भाग घेतला होता. त्यामध्ये डॉ. संजीव पाटील संघ व अशोक पाटील संघ यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात अशोक पाटील संघाने डॉ. संजीव पाटील संघाचा 25-11, 15-25, 25-16, 25-27, 25-17 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुणे जगदीश पाटील, श्रीनाथ देशपांडे, सरिता पाटील, मंजेरी पाटील, माधवी गोजे पाटील, हर्षवर्धन शिंगाडे, डीसीसी बँकेचे मॅनेजर शिवा बागेवाडी, शंकर नाईक, संग्राम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या अशोक पाटील संघाला व उपविजेत्या डॉ. संजीव पाटील संघाला चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. विजयी संघात सुधीर चौगुले, रूपेश कलमती, अशोक पाटील, उमेश अंबरगट्टी, सोमनाथ रेहमान, सुभाष, ज्ञानेश्वर व सतीश यांचा समावेश आहे.