क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
म्हार्दोळ येथील युनायटेड स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या फेस्टीव्हल सामन्यात युनायटेड वॅटरन्सने सरपंच इलेव्हन संघावर विजय मिळवून आकर्षक चषक पटकावला. म्हार्दोळ मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. विश्वास फडते व सागर एकोस्करचे अर्धशतक तसेच मनोज म्हार्दोळकरने घेतलेले 5 बळी हे या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले.
सरपंच इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 25 षटकात सर्वबाद 197 धावा केल्या. नितीन कोठंबीकरने 28, डॉ. अजय पेडणेकर 25, रामू नाईक 18, संजय भंडारी 15, महेश गवंडी व निलेश धायगोडकर प्रत्येकी 12, मंगलदास गावडे व लॉरेन्स गोमीस प्रत्येकी 11 व नरेश गावणेकरने 10 धावांचे योगदान दिले. मनोज म्हार्दोळकरने 22 धावात 5, महेश कोनेकर 34 धावात 3 तर सागर एकोस्कर व दिलीप नाईकने प्रत्येकी 1 गडी बाद केला. विजयी 198 धावांचे उद्दिष्टय़ युनायटेड संघाने विश्वास फडतेच्या 51, सागर एकोस्कर 50 व तेजस फडतेच्या 25 धावांच्या जोरावर पार केले. सरपंच इलेव्हनतर्फे नरेश गावणेकरने 8 धावात 1 व नितीन कोठंबीकरने 17 धावात 1 गडी बाद केला.
स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून संजय भंडारी, उत्कृष्ट झेल मनोज म्हार्दोळकर, सर्वाधिक चौकार नितीन कोठंबीकर, सर्वाधिक षटकार विश्वास फडते, उत्कृष्ट यष्टीरक्षक बिपीन मंगेशकर, स्टायलीस्ट खेळाडू किरण पौडवाल, सर्वाधिक बळी मनोज म्हार्दोळकर, उत्कृष्ट फलंदाज सागर एकोस्कर, गोलंदाज निलेश नागवेकर, अष्टपैलू खेळाडू डॉ. अजय पेडणेकर, तंदुरुस्त खेळाडू लॉरेन्स गोमीस व सामनावीर म्हणून विश्वास फडते यांना पारितोषिके देण्यात आली. सामन्याला वेलिंग-प्रियोळ-कुंकळय़े पंचायत, सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर, जि. पं. सदस्य दामोदर नाईक, पंचसदस्य ऍड. वरद म्हार्दोळकर, शैलेश च्यारी, निलेश नागवेकर, संजय म्हार्दोळकर व विरेंद्र म्हार्दोळकर यांचे आर्थिक साहाय्य लाभले. नंदू म्हार्दोळकर व दीपक घाडी यांनी सामन्याचे पंच म्हणून कामगिरी केली. स्कोअरर म्हणून क्षितीज नाईक यांनी काम पाहिले. शानबाग व चेतन म्हार्दोळकर यांनी समालोचन केले. यावेळी रमेश गावडे, मनू नाईक व प्रताप नाईक या स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला. पारितोषिक वितरणप्रसंगी सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर, जि. पं. सदस्य दामोदर नाईक, माजी जि. पं. सदस्य शिवदास गावडे, डॉ. मधू घोडकीरेकर, युनायटेड क्लबचे संस्थापक उल्हास म्हार्दोळकर, अध्यक्ष डॉ. घनश्याम म्हार्दोळकर, पंचसदस्य ऍड. वरद म्हार्दोळकर, डॉ. दत्ता भट, मेघश्याम म्हार्दोळकर, नरेश म्हार्दोळकर, दिनेश नाईक आदी उपस्थित होते. स्वागत डॉ. मेघश्याम म्हार्दोळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय पेडणेकर यांनी तर ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी आभार मानले.