नवी दिल्ली
2020 या वर्षांमध्ये भारतात 17 युनिकॉर्न निर्माण झाले होते, तर चीनमध्ये ही संख्या 16 इतकी राहिली. मागील काही काळापासून डिजिटल आणि तंत्रज्ञान कंपन्यांवर चीन सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचा प्रभाव आता दिसून येत आहे. 2019 मध्ये भारतात केवळ 8 यूनिकॉर्न निर्माण झाले होते, तर चीनमध्ये ही संख्या 31 इतकी होती.
यूनिकॉर्नप्रकरणी भारत आता अनेक विकसित देशांपेक्षा आघाडीवर आहे. चीन, ब्रिटन आणि कॅनडाच्या तुलनेत भारतात 2021 या वर्षाच्या तिसऱया तिमाहीत यूनिकॉर्नची संख्या विकसित देशांहून अधिक झाली आहे.
व्हॅल्यूएशन (मूल्य) किमान 1 अब्ज डॉलर्स असलेल्या स्टार्टअपला यूनिकॉर्न मानले जाते. चालू वर्षाच्या तिसऱया तिमाहीत भारताने 10 यूनिकॉर्न जोडले आहेत. याच कालावधीत चीन आणि हाँगकाँगमध्ये 7, अमेरिका आणि कॅनडात 4 यूनिकॉर्नची भर पडली आहे. यातून भारतात गुंतवणूक हालचालींमध्ये वेगाने वृद्धी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
सप्टेंबर तिमाहीत भारतीय स्टार्टअप्सनी 347 व्यवहारांद्वारे सुमारे 11 अब्ज डॉलर्सचा निधी उभारला आहे. कुठल्याही तिमाहीत भारतीय स्टार्टअप्सकडून पहिल्यांदाच 10 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकच निधी जमविण्यात आला आहे. 2021 च्या पहिल्या तीन तिमाहीत भारतीय स्टार्टअप्सनी 24 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.
अमेरिकेत सर्वाधिक
अमेरिकत चालू वर्षाच्या तिमाहीत 68 यूनिकॉर्न निर्माण झाले आहेत. चालू वर्षाच्या तिसऱया तिमाहीत भारताच्या स्टार्टअप्समध्ये सुमारे 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आणि याच्याशी संबंधित 347 व्यवहार झाले.