वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त केलेली मांस आणि सीफूडची विक्री करणारी टेक स्टार्टअप कंपनी लिशियसने त्यांच्या सिंगापूरच्या अमांसा कॅपिटलच्या सहकार्याने 1,140 कोटी रुपयांची उभारणी(15 कोटी डॉलर्स) केली आहे.
गुंतवणूक शेणीमध्ये एफ 2 मधील प्रमुख गुंतवणूकदार हे कोटक पीई आणि ऍक्सिस ग्रोथ ऐवेन्यूज एआयएफ11 यांचा समावेश आहे. भारताची पहिली मूल्यवान डायरेक्ट टू कंझ्युमर (डी2सी) युनिकॉर्न कंपनी बनली आहे. स्टार्टअपने जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीत ही मजल मारली असल्याची नोंद करण्यात आली आहे. प्राप्त केलेल्या रक्कमेचा वापर हा तंत्रज्ञानावर गुंतवणुकीसाठी करण्यात येणार आहे.